Inspiring Story : 2 एकर मध्ये 13 लाखांचे उत्पन्न ; मल्चिंग व ठिंबकमुळे उत्पादनात वाढ ;संपुऑर्ण शेती भाजीपाला लागवड़ीखाली


कारल्याच्या पिकातून आर्थिक प्रगती साधली . केवळ सहा महिन्यात 2 एकर मधून विक्रमी 30 टन कारल्याचे उत्पादन. 5 लाखाचा निव्वळ नफा.पारंपारिक पद्धतीने शेती करण्याच्या पद्धतीला फाटा देत पाण्याचा कमी वापर करून पिकांचे योग्य नियोजन,उपलब्ध पाण्याचा काटकसरीणे वापर, मल्चिंग आणि ठिंबकचा योग्य उपयोग करून शेतीतुन सोनं पिकवले आहे.नागपुर पासून 50 किमी अंतरावर असणार्या निलज येथील एका शेतकऱ्याने कारल्याच्या विक्रमी उत्पादनातून वर्षाला 13 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावून आर्थिक उन्नती साधली आहे. Inspiring Story: Income of 13 lakhs in 2 acres


विशेष प्रतिनिधी

नागपुर: पवनी तालुक्यातील निलज फाटा या गावातील नरेश ढोक या तरुण शेतकऱ्याने पारंपारिक धान्यं उत्पादनाला फाटा देत संपुर्ण शेती भाजीपाला लागवड़ीखाली आणली. त्यांच्याकडे स्वत:ची चार एकर शेती आहे. यात पूर्वी त्यांचे वडील रामचंद्र ढोक पारंपरिक पद्धतीने धान्य पिक घेत होते.10 वर्षापूर्वी नरेश यांनी शेतीत लक्ष घातले. शेतात विंधन विहीर तयार केली. सिंचनाची सुविधा होताच नरेशने हळूहळू संपूर्ण शेतीत भाजीपाला लागवड सुरु केली. ही सर्व शेती त्यांनी ठिंबक सिंचनाखाली आणली आहे.नरेशने 2 एकर शेतीत कारल्याच्या US 6207 वाणाची लागवड केली. पहिले कारल्याचे पिक ऑगस्ट मध्ये घेतले. पाण्याचा कमी वापर आणि तण व्यवस्थापनासाठी त्यांनी मल्चिंगचा वापर केला. यासाठी 41 हजार रुपये खर्च आला. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिक घेण्यावर त्यांचा भर असतो. पाणी वाचले तर आणखी एका हंगामाचे नियोजन करता येते असे ते सांगतात. म्हणूनच ठिंबकद्वारे पाणी आणि विद्राव्य खते दिली.

केवळ दीड महिन्यात कारल्याचे पिक अतिशय डौलदारपणे शेतात उभे राहिले. या पहिल्या पिकातून त्यांना लागवडीपासून ते विकण्यापर्यतचा सर्व मिळून 2 लाख 55 हजार रुपयांचा खर्च वजा जाता 4 लाख 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. केवळ 6 महिन्यात त्यांनी जवळपास 5 लाख रूपये शेतीतुन कमावले.

नरेशने मार्केटची चाचपणी करून पुन्हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याच वाणाची लागवड केली. यावेळी त्यांना मल्चिंगचा आणि आधाराचा खर्च वाचला. हे पिक साधारण फेब्रुवारीमध्ये विकण्यास तयार झाले. यावेळी 2 एकरातुन विक्रमी 30 टन कारल्याचे उत्पादन झाले. भावही चांगला मिळाला. एकूण 1 लाख 71 हजार रुपये खर्च वजा जाता नरेशला 8 लाख 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.

ऑगस्ट ते मार्च या आठ महिन्यात केवळ 2 एकरात नरेशने कष्टाने 13 लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. शेती तोट्याची आहे असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नरेशने केलेली शेती निश्चितच प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या कामात त्यांचे आई- वडील, पत्नी सर्वांचीच मदत होते असे नरेश यांनी सांगितले.

नरेश केवळ कारल्याचे उत्पन्न घेऊन थांबत नाहीत तर मधु मका लावण्याचा प्रयोग, गॅलार्डियाची फुले असोत की शेडनेट मधील ढोबळी मिरची नरेश सतत वेगवेगळे आधुनिक तंत्र वापरून विविध पिक घेण्याचा प्रयत्न करतात.
नरेश ढोक यांनी केलेल्या आधुनिक पिक पद्धतीने शेती करण्यास नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.

Inspiring Story: Income of 13 lakhs in 2 acres

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती