प्रवासात कारमध्ये हवा ‘फर्स्ट एड बॉक्स’ प्राण वाचविणाऱ्या या सोबतीचा आग्रह धरा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रवासादरम्यान एखादा अपघात झाला तर फर्स्ट एड बॉक्स महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे तुम्ही नवी कार घेतली असेल तर त्यात फर्स्ट एड बॉक्स अर्थात प्रथमोपचार पेटी आहे, का हे आवर्जून पाहावे. नसल्यास तो देण्याचा आग्रह वाहन विक्रेत्याकडे धरला पाहिजे. रस्ते सुरक्षेसाठी तो अनिवार्य आहे. पण त्याकडे वाहन विक्रेते दुर्लक्ष करत आहेत.Insist on a life-saving first aid box in the car while traveling

केंद्रीय मोटार वाहन 2020 च्या नियमानुसार ग्राहकाला प्रथमोपचार पेटी देणे वाहनविक्रेत्याला बंधनकारक आहे. रस्ते सुरक्षा कायद्यानुसारही प्रथमोपचार पेटी कारमध्ये ठेवणे आवश्यक आहे.ती नसल्यास दुर्घटनेवेळी वैद्यकीय मदत पोचेपर्यंत उपचार करता येत नाहीत. 32 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या बैठकीत हा विषय प्रकर्षाने चर्चेला आला होता. 1999 मध्ये वाहनात प्रथमोपचार पेटी अनिवार्य केली आहे. परंतु, वाहनमालक, विक्रेते याकडे दुर्लक्ष करत आहेत.

प्रथमोपचार पेटीत दडलय काय?

1) रक्तस्त्राव रोखणारे फेरॅक्रीलम औषध असावे
2)निर्जंतुक कापसाचे, रेशमाचे कापड हवे
3)औषधी वाशप्रूफ प्लास्टर
4 )रोल केलेले कापसाचे, रेशमाचे तलम पारदर्शक कापड
5)लवचिक चिकटणारी फॅब्रिक टेप
6)लवचिक, फॅब्रिक सेटरीमाईड क्रीम, फेरॅक्रिसिलम जेल 1 टक्के आणि पीव्हीसी पाऊच असले पाहिजेत.

गोल्डन अवरमध्ये ठरणार रामबाण

अपघाताच्या वेळी आणि आणीबाणीच्या प्रसंगी प्रथमोपचार पेटी महत्वाची असते. गोल्डन अवर अर्थात अती महत्वाच्या काळात जखमींचा जीव वाचविण्यासाठी ही पेटी महत्वाची भूमिका बजाऊ शकते. तातडीने उपचार पेटीतील औषधाच्या मदतीनं केल्यास एखाद्याचा जीव वाचेल.

त्यामुळे वाहनात या पेटीचा आग्रह विक्रेत्यांकडे ग्राहकांनी धरला पाहिजे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहात ही पेटी महत्वाची आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.

Insist on a life-saving first aid box in the car while traveling

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था