भारत- चीनच्या सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेला वेग येणार, चर्चेला पुन्हा सुरुवात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. हॉट स्प्रिंग, गोगरा आणि देस्पांग या भागांमधील सैन्य माघारीचा मुद्दा यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी होता. Indo – china dialogue begin once again

सीमावर्ती भागांतील तणाव कमी व्हावा म्हणून चीनने अन्य भागांमधून देखील माघार घ्यावी, असा आग्रह भारताकडून धरण्यात आला आहे. मागील नऊ महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सैन्य माघारीच्या प्रक्रियेला आणखी पुढे नेणे हाच यामागचा उद्देश आहे.सीमावर्ती भागामध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून दोन्ही देशांनी पुढाकार घेतला असून यासाठीच सैन्याला देखील माघारी बोलाविले जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारत आणि चीनच्या कोअर कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमधील ही दहावी फेरी आहे. चीन आणि भारताने देखील पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून आपआपले लष्कर माघारी बोलाविल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Chinese soldiers killed in the Galvan Valley first public confession from China

चीनकडून पहिल्यांदाच जाहीर कबुली, गलवान खोऱ्यात मारले गेले चिनी सैनिक, नावेही दिली

Indo – china dialogue begin once again

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी