वृत्तसंस्था
मुंबई : शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी थयथयाट केल्यानंतर आता देशातून त्याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda, lata mangeshkar supports modi govt
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, कंगना राणावत, अक्षय कुमार, अजय देवगण, एकता कपूर, विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. यात आता गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची भर पडली आहे.
लतादीदींनी देखील कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटलेय, की भारत महान देश आहे आणि आपण सगळे भारतीय यामुळे गौरवान्वित आहोत.
एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा किंवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. आपल्या लोकांचे हित लक्षात घेऊन शांततेने समस्या सोडवण्यासाठी आपण सक्षम आहोत, जय हिंद!!
#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda pic.twitter.com/JpUKyoB4vn
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) February 3, 2021
या ट्विटमध्ये लतादीदींनी ‘इंडिया टूगेदर’ आणि ‘इंडिया अगेनस्ट प्रोपगेंडा’ असे हॅशटॅगही दिले आहेत.