India’s Youngest Female Pilot Ayesha Aziz : कश्मीरची आयशा अजीज भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आता अशी कोणतीही गोष्ट नाही जी महिला करू शकत नाहीत. महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे 25 वर्षीय आयशा अजीजची. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आयशा ही देशातील सर्वात तरुण महिला पायलट आहे.India’s Youngest Female Pilot Ayesha Aziz

ती महिला सशक्तीकरणाची प्रेरणा आणि उत्कृष्ट उदाहरण आहे.


आयशा अजीज वयाच्या 25 व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक (Youngest Female Pilot in India) बनली आहे. तीच्या या कामगिरीमुळे ही कश्मीरी तरुणी देशातील असंख्य तरुणी आणि महिलांसाठी प्रेरणा ठरली आहे. सन 2011 मध्ये आयेशा ही देशातील सर्वात कमी वयाची वैमानिकाचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ठरली होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिने रशियाच्या सोकोल एअरबेसवर MIG-29 jet उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले.

 

भारतीय वंशाच्या भव्या लाल नासाच्या कार्यकारी प्रमुख

 

आयशाने बॉम्बे फ्लाइंग क्लब-बीएफसी (Bombay Flying Club-BFC) येथून विमानोड्डानाचा व्यावसायिक परवाना घेतला. तिने एएनआयशी बोलताना सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये कश्मीरी तरुणींनी विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. परंतू, वैमानिक म्हणून खूपच कमी कश्मीरी महिला या क्षेत्रात असल्याचे आहेत.


मला वाटते की, कश्मीरी मिहाल या खूप चांगले काम करत आहे. खास करुन शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आलिकडे त्या पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ लागल्या आहेत. घाटीमधील महिलाही चांगली कामगिरी करत आहेत.

मी हे क्षेत्र निवडले आहे कारण मला अगदी लहानपणापासूनच प्रवास करणे आवडते. आकाशात उडणाऱ्या विमानांनी लहानपणापसूनच मला खूप आकर्षित केले होते. म्हणूनच मला पायलट व्हायचे होते. हे खूप आव्हानात्मक काम होते. आता मला नवीन जागा, विविध प्रकारचे हवामान आणि नवीन लोकांना भेटाण्यासाठी सतत तयार रहावे लागेल, असे ती म्हणाली.

India’s Youngest Female Pilot Ayesha Aziz

पुढे बोलतांना आयशा म्हणाली मला माहिती आहे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. माझ्या स्वप्नांना बळ दिल्याबद्दल मी माझ्या आई वडीलांची आभारी आहे. त्यांनी मला माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची मदत केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*