भारताचा परकीय गंगाजळीचा विक्रम, रशियालाही मागे टाकले

भारताच्या परकीय गंगाजळीत सातत्याने वाढ होत असून डॉलर्सच्या साठ्यात रशियालाही मागे टाकले आहे. भारत हा डॉलर्सचा साठा असलेला जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या परकीय गंगाजळीत सातत्याने वाढ होत असून डॉलर्सच्या साठ्यात रशियालाही मागे टाकले आहे. भारत हा डॉलर्सचा साठा असलेला जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. India’s Forex Reserves Surpass Russia’s To Become World’s 4th Biggest.

कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी म्हणून दक्षिण अशियाई देशांच्या मध्यवर्ती बॅँकांनी डॉलर्सचा साठा वाढविला होता. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा परकीय गंगाजळीचा साठा ५६०.३ बिलीयन डॉलर्स आहे. रशियाचा साठा ५८०.१ बिलीयन डॉलर्स आहे. चीनकडे सध्या जगातील सर्वाधिक डॉलर्सचा साठा आहे. त्यापाठोपाठ जपान आणि स्वित्झर्लंडचासमावेश आहे.भारताकडे सध्या असलेल्या परकीय गंगाजळीचा साठा अठरा महिन्याचे आयात बिल देण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे स्थानिक शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढत आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, परकीय गंगाजळीचा साठा वाढल्याने क्रेडीट रेटींग कंपन्यांनी भारताला चांगले मानांकन दिले आहे. भारत परदेशी कर्जे फेडण्यास समर्थ आहे, असा विश्वासही निर्माण झाला आहे.
डाईश बॅँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसू म्हणाले, गेल्या काही वर्षांत भारतात परकीय गंगाजळीचा साठा वाढत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅँकेला धाडसी निर्णय घेणे शक्य होणार आहे.

India’s Forex Reserves Surpass Russia’s To Become World’s 4th Biggest.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*