भारतीय रेल्वेने मोडले उत्पन्नाचे विक्रम, डिसेंबरमध्ये मिळाले ११ हजार ७८८ कोटी रुपये

भारतीय रेल्वेने उत्पन्नाचे विक्रम मोडले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये 118.13 दशलक्ष टन मालवाहतूक केली असून, वाहतुकीतून 11 हजार 788 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. याच काळात मागील वर्षी 108.84 दशलक्ष टन मालाची वाहतूक करीत 11,030.37 कोटी उत्पन्न प्राप्त केले होते. Indian Railway breaks revenue record in December with Rs 11,788 crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने उत्पन्नाचे विक्रम मोडले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये 118.13 दशलक्ष टन मालवाहतूक केली असून, वाहतुकीतून 11 हजार 788 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. याच काळात मागील वर्षी 108.84 दशलक्ष टन मालाची वाहतूक करीत 11,030.37 कोटी उत्पन्न प्राप्त केले होते.

रेल्वेने नव्या धोरणानुसार मुख्य शहरांना जोडणाऱ्या 11 हजार किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र रेल्वे मार्गाच्या उभारणीला संमती दिली आहे. 2 लाख 22 हजार वाघिणींची क्षमता वाढविली आहे. भारतीय रेल्वेने सन 2019 च्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये रेल्वेने 757.74 कोटी अतिरिक्त (6.87 टक्के) उत्पन्न मिळविले आहे.कोरोना संकटाच्या काळात कामगिरीमध्ये सुधारणा करून माल वाहतुकीतून उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे. देशातील उद्योजकांना रेल्वेच्या मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीही देण्यात येत आहेत. तसेच, संस्थात्मक सुधारणाही केल्या जात आहेत. कोरोना टाळेबंदी काळात देशातील बहुतांश उत्पादन थांबले असतानाही भारतीय रेल्वेने माल वाहतुकीचे अनेक विक्रम मोडले.

त्यातून वेळ, मनुष्यबळ व पैशांची बचत झाली आहे. या महामारी काळाला संधी मानत मोठा महसूल गोळा करण्यात यश मिळविले आहे. आता रेल्वेकडून नाशवंत माल वाहून नेण्यासाठी वातानुकूलित वाघिणी (वॅगन्स) वापरण्यात येत आहेत. ग्रीनव्हॅन सोयीद्वारे ताजी फळे व भाज्यांची वाहतूक केली जाते. आतापर्यंत मालगाड्यांनी गाठलेला कमाल वेग 4 हजार 700 मेट्रिक टनांसाठी ताशी 100 किलोमीटर (62 मैल) इतका नोंदविला आला आहे.

Indian Railway breaks revenue record in December with Rs 11,788 crore

रेल्वे व्हिजननुसार, सन 2024 पर्यंत माल वाहतूक 2024 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 2026 पर्यंत देशातील एकूण माल वाहतूक 6 हजार 400 टनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील 2019 मध्ये रेल्वेकडून 1,210 दशलक्ष टन, तर 2020 मध्ये एकूण 4,700 दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली. रेल्वे व्हिजन 2024 साठी 2.9 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय योजनांबाबत गुंतवणूकदार आणि इतर घटकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. रेल्वेचा खर्च कमी करणे आणि माल वाहतुकीचा दर स्पर्धात्मक करणे, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी यापूर्वीच म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*