हवाईयुद्धात अमेरिका तर सागरी युद्धात चीन ठरेल सरस, भारताच्या लष्कराची चौथ्या स्थानी झेप

विेशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगात सागरी युद्धात चीन सरस ठरेल, तर हवाईयुद्धात अमेरिका आणि जमिनीवरील युद्धात रशिया बाजी मारेल असे ‘मिलिटरी डायरेक्ट’ने म्हटले आहे.
लष्करासाठी खूप मोठा खर्च अमेरिका दर वर्षी करते. असे असूनही लष्करी ताकदीच्या बाबतीत ते ७४ गणांसह चीनच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रशियाचा ६९ गुणांसह तिसरा क्रमांक लागतो, तर भारत ६१ गुणांसह चौथ्या क्रमांकर आहे. पाचवा क्रमांक फ्रान्सचा आहे. त्यांना ५८ गुण आहेत, अशी माहिती मिलिटरी डायरेक्ट या वेबसाइटने जाहीर केलेल्या अभ्यासात हे निरीक्षण मांडण्यात आले आहे. Indian military stand fourth position in world

एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनने पहिल्या दहा देशांमध्ये कसाबसा क्रमांक मिळविला आहे. ते नवव्या क्रमांकावर आहेत. चीनला १०० पैकी ८२ गुण देण्यात आले आहेत. ‘अल्टिमेट मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स’ या नावाने विविध घटकांच्या आधारे ‘मिलिटरी डायरेक्ट’ने जगभरातील लष्करांचा आढावा घेतला आहे.प्रत्येक देशातील लष्कराच्या क्षमतांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला. अमेरिका आपल्या लष्करावर दरवर्षी सर्वाधिक म्हणजे ७३२ अब्ज डॉलर खर्च करते. त्याखालोखाल चीन २६१ अब्ज डॉलर खर्च करते, तर भारत ७१ अब्ज डॉलर आपल्या लष्करावर खर्च करतो.

काल्पनिक युद्धाचाही विचार ही क्रमवारी ठरविताना केला आहे. अमेरिकेकडे १४१४१ विमान आहेत, त्या तुलनेत रशियाकडे ४६८२ आणि चीनकडे ३५८७ विमाने आहेत. जमिनीवरील युद्धात बाजी मारू शकणाऱ्या रशियाकडे ५४८६६ लष्करी वाहने आहेत. सागरी क्षमतेचा विचार करता चीनकडे ४०६ लष्करी जहाजे आहेत

Indian military stand fourth position in world

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*