“ये हौसला कैसे रूके” कश्मीरमधील भारतीय सैन्य जनतेसाठी देवदूत

मुसळधार हिमवृष्टीमुळे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना जीव गमवावा लागला आहे. सैनिकांनी या बर्फाच्छादित क्षेत्रात अडकलेल्या काश्मिरी महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत केली. Indian military is an angel for the people in Kashmir


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर: उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारा येथे बुधवारी भारतीय लष्कराचे जवान गरोदर महिलेसाठी देवदूत बनून आले.

मुसळधार हिमवृष्टीमुळे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना जीव गमवावा लागला आहे .वृत्तानुसार सैनिकांनी या बर्फाच्छादित क्षेत्रात अडकलेल्या काश्मिरी महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत केली. बुनावदारच्या कंपनीच्या ऑपरेटिंग बेसला मदतीसाठी फोन आला ज्यामध्ये गुलाम मोहम्मद मीर निमा बानो ह्या पेठवडार येथे राहतात आपल्या गर्भवती मुलीच्या प्रसूतीसाठी त्यांनी लष्कराकडे मदत मागितली. एका गर्भवती महिलेला त्रास होत आहे आणि प्रचंड हिमवृष्टीमुळे कुटुंबीय तिला रुग्णालयात दाखल करण्यास अक्षम आहेत हे कळताच पेट्रोलिंग करणार्या सैन्याने सदरील महिलेला स्ट्रेचर वर गुढघाभर बर्फातून ददवाखान्यात दाखल केले.जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आपल्या कर्मचार्‍यांना व यंत्रणेला सेवेत आणण्यासाठी दबाव टाकला असला तरी,सतत होणार्‍या हिमवृष्टीमुळे स्नो क्लीयरन्स कार्यात अडथळा निर्माण झालेला आहे. अशातच सदैव तत्पर असणार्या भारतीय सैन्याने या महिलेची तत्काळ मदत केली.

लष्कराच्या सीओबी बनवदार संघाने उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गरोदर महिलेला तब्बल पाच किलोमीटर गुडघ्यापर्यंत बर्फ तुडवत दवाखान्यात दाखल केले. सदरील महिलेने निरोगी बाळाला जन्म दिला आहे. तिने वेळेवर रुग्णालयात पोहचवण्यासाठी भारतीय सैन्याची आभार मानत त्यांना देवदूत असे संबोधले आहे.

सुरवातीला एक किलोमीटर प्रथमोपचार केंद्रात काही तपासण्या केल्या नंतर प्रसुतीसाठी तीला दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. जोरदार हिमवृष्टीमुळे सर्व रस्ते अडविण्यात आले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावर वाहतुकीची व्यवस्था करता येणार होती.म्हणूनच, सैन्याने पुन्हा गर्भवती महिलेस स्ट्रेचरवरुन वाहतुकीच्या ठिकाणी नेले. त्या संध्याकाळी या महिलेची प्रसूती झाली आणि आई व बाळ सुखरुप घरी पोहचले.

Indian military is an angel for the people in Kashmir

सैन्याच्या वेळेवर प्रतिक्रिया व प्रयत्नांमुळे या महिलेची प्रसूती सुरक्षित व यशस्वी झाली. सैन्य दलाने दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल कुटुंबाने त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. भारतीय सैन्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे की ते कश्मिरी जनतेसाठी देवदूत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*