भारतीय कोरोना व्हॅक्सीनला अफगानिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, तालिबान आणि अल कायदाच्या पुन्हा एकदा कुरापती

भारताकडून अफगाणिस्तानला पहिल्या टप्प्यातील कोरोना लसी पोहचल्या आहेत. यानंतर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ट्विट करत भारताचे आभार मानले.Indian corona vaccine at risk of terrorist attack in Afghanistan


विशेष प्रतिनिधी

काबुल : भारताकडून मित्र राष्ट्र अफगाणिस्तानला पहिल्या टप्प्यातील कोरोना लसी पोहचल्या आहेत. यानंतर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ट्विट करत भारताचे आभार मानले. मात्र, दुसरीकडे अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे भारताकडून मिळालेल्या या कोरोना लसींची सुरक्षितता हे अफगाणिस्तानसमोरील मोठं आव्हान आहे. सालेह यांनी देखील या कोरोना लसीचं क्वेटोचे हल्ले, आयईडी स्फोट आणि दहशतवाद्यांपासून संरक्षण करणं यालाच अधिक प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे .

उप राष्ट्रपती सालेह यांच्याआधी अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांनी देखील तालिबानला अफगाणिस्तानमधील शांततेत सर्वात मोठा अडसर असल्याचं म्हटलंय. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अनेक हत्यांचं सत्र सुरु झालंय.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या देखरेख आणि संशोधन समितीने नुकताच दिलेल्या अहवालात तालिबानने आपलं आश्वासन मोडलं असल्याचं म्हटलं.तालिबान आणि अल कायदा पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये अराजकता पसरवण्याच्या तयारीत असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

तालिबानच्या काही कुरापतींमुळे अफगाणिस्तानसह भारताचीही चिंता वाढली आहे. तालिबानने आयएसआयएल या संघटनेला मदत केल्याचं बोललं जातंय.
सध्या अफगाणिस्तानमधून अमेरिकेचं सैन्य माघारी परतत आहे. मात्र, हे सैन्या गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्धाची स्थिती तयार होईल, असाही इशारा देण्यात येत आहे.

Indian corona vaccine at risk of terrorist attack in Afghanistan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*