भारतीय नागरिक पाकमधून तब्बल 11 वर्षांनंतर परतला

भारत आणि पाकिस्तानात असलेले वैर जगजाहीर आहे. पण, अनेकदा सुखद घटनाही घडतात. त्यापैकी ही एक घटना आहे. Indian citizen returns from Pakistan after 11 years


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पाकिस्तानात गेलेला एक भारतीय नागरिक तब्बल 11 वर्षांनंतर भारतात परतला आहे. एखाद्या चित्रपटाची कथेला शोभावे, अशी ही घटना आहे.

भारत आणि पाकिस्तानात असलेले वैर जगजाहीर आहे. पण, अनेकदा सुखद घटनाही घडतात. त्यापैकी ही एक घटना आहे. कारण 11 वर्षांपासून भारतातून बेपत्ता झालेला माणूस परतला आहे.

पनवासी लाल, असे त्या भारतीयांचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. 11 वर्ष तो पाकिस्तानात राहत होता. परंतु तो तेथे कसा पोचला हे त्याला माहित नाही. 17 नोव्हेंबर 2020 रोजी तो भारतात परत आला.

Indian citizen returns from Pakistan after 11 years

त्यांची मानसिक स्थिती स्थिर नसल्यामुळे तो पाकिस्तानला कसा पोहोचला हे त्याला आठवत नाही. जानेवारीत त्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले,अशी माहिती अटारी-वाघा सीमेवरील प्रोटोकॉल अधिकारी (पोलिस) ए. पी. सिंह यांनी दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*