हिमवर्षावात अडकलेल्या आई-बाळाच्या मदतीसाठी धावून आले जवान, 6 किमी चालत सुखरूप घरी पोहोचवले

Indian Army rescues mother and new Born stranded in the snow by walking 6 km In Kupwara Jammu And Kashmir

संपूर्ण विश्वात आपल्या सामर्थ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सैन्याने पुन्हा एकदा कमाल केली आहे. जवानांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा अनोखा दाखला दिला आहे. जवानांनी जम्मू-काश्मिरात हिमवर्षावात अडकलेल्या आई आणि नवजात बाळाला 6 किमी चालत जाऊन त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याच्या घटनेचे देशभरात कौतुक होते. Indian Army rescues mother and new Born stranded in the snow by walking 6 km In Kupwara Jammu And Kashmir


विशेष प्रतिनिधी

कुपवाडा : संपूर्ण विश्वात आपल्या सामर्थ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सैन्याने पुन्हा एकदा कमाल केली आहे. जवानांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा अनोखा दाखला दिला आहे. जवानांनी जम्मू-काश्मिरात हिमवर्षावात अडकलेल्या आई आणि नवजात बाळाला 6 किमी चालत जाऊन त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याच्या घटनेचे देशभरात कौतुक होते.

ही घटना कुपवाडा जिल्ह्यातील आहे. येथे एक आई आपल्या नवजात बाळासह रुग्णालयात अडकली होती. कुपवाड्यात प्रचंड बर्फवृष्टी झाली होती. यानंतर भारताच्या जवानांनी आई आणि बाळाला बाजेसकट आपल्या खांद्यावर उचलून बर्फाच्या जाड थरातून 6 किमी चालत घरी पोहोचवले.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या ट्विटर हँडलने ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे. त्यात लिहिलेय की, “भारतीय सैन्याच्या जवानांनी लोलाबच्या दर्दपुरा येथे राहणाऱ्या फारुख खसाना यांच्या पत्नी आणि नवजात बाळाला बर्फवृष्टी सुरू असताना 6 किलोमीटर अंतर चालत घरी नेले. चिनार कॉर्प्सने या घटनेचा व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.

Indian Army rescues mother and new Born stranded in the snow by walking 6 km In Kupwara Jammu And Kashmir

वृत्तसंस्था एएनआयनुसार, फारुखच्या एका नातेवाइकाने सांगितले की, “खसानाच्या पत्नीने काल रुग्णालयात मुलाला जन्म दिला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हे दोघे जोरदार हिमवृष्टीमुळे तिथेच अडकून राहिले होते. 28 आरआर बटालियनच्या सैन्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना घरी पोहोचण्यास मदत केली. मी त्यांचा आभारी आहे.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती