भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) मिग -२१ बायसन विमानाचा अपघात; ग्रुप कॅप्टन गुप्ता शहीद

  • भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) मिग -२१ बायसन विमानाचा बुधवारी अपघात(accident of fighter plane) झाला. यात आयएएफचे एक ग्रुप कॅप्टन शहीद(group captain dead) झाले आहेत. Indian Air Force (IAF) MiG-21 Bison crash; Group Captain Gupta martyred

विशेष प्रतिनिधी

दिल्ली: भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) मिग -२१ बायसन विमानाचा बुधवारी सकाळी अपघात(accident of fighter plane) झाला. यात आयएएफचे एक ग्रुप कॅप्टन शहीद(group captain dead) झाले आहेत.एअरफोर्सच्या सेंट्रल इंडिया बेस येथे मिग -२१ विमान लढाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातात शहीद झालेल्या ग्रुप कॅप्टनचे नाव ए. गुप्ता आहे. या अपघातामागील कारण शोधण्यासाठी आयएएफने कोर्ट ऑफ इन्क्वायरी (तपास) स्थापन केली आहे.

वायुसेनेने या अपघातात शहीद कॅप्टन ए . गुप्तांबद्दल शोक व्यक्त केला आहे. आयएएफने म्हटले आहे की या दु:खाच्या घटनेत आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत उभे आहोत. प्राथमिक माहितीनुसार हवाई दलाच्या ग्वाल्हेर तळावर कॉम्बॅट प्रशिक्षण सुरू होते.

Indian Air Force (IAF) MiG-21 Bison crash; Group Captain Gupta martyred

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*