India vs England T20 : भारत – इंग्लंड टी 20 मालिकेत भारताचा डंका : विराट कोहली ‘मॅन ऑफ द सीरिज’ ; आता लक्ष ‘ पुणे ‘

  • विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (india vs england t20 series 2021) एकूण 231 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने (man of the series) गौरवण्यात आले.

  • पुण्यात सुरू होणार वन डे सिरीज 23 मार्चला पहिला सामना india vs england t20 series 2021 virat kohli won the man of the series

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : भारताने पाहुण्या इंग्लंडला पाचव्या टी 20 सामन्यात 36 धावांनी (India vs Engaland 5th T20i) पराभूत केलं. भारताने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली.कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. या सामन्यात विराटने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. विराटने सुरुवातीपासून या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

विराटची मालिकेतील कामगिरी

विराटने या 5 सामन्यांच्या मालिकेत एकूण 231 धावा केल्या. यामध्ये त्याने खणखणीत 3 अर्धशतकं झळकावले. विशेष म्हणजे विराट या तिनही वेळेस नाबाद राहिला. तसेच विराटने या पाचव्या सामन्यात 80 धावांच्या नाबाद खेळीसह अनेक विक्रम केले. विराट टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विराटच्या नावे यासह आता टी 20 मध्ये कर्णधार म्हणून 1 हजार 463 धावांची नोंद झाली आहे.

दरम्यान , आता टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

india vs england t20 series 2021 virat kohli won the man of the series

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*