नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दणदणीत विजय; इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव; मालिकेत 2-1 अशी आघाडी

वृत्तसंस्था

अहमदाबाद : जगातल्या सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारताने कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. India victory at the Narendra Modi Stadium vs england test

दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा काढल्या तर शुभमन गिलने 21 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांवर नाबाद राहिला.

दोन दिवसांत कसोटी सामना आटोपण्याची ही 22वी वेळ आहे. मोटेरा येथे खेळला गेलेला हा कसोटी सामना दुसर्‍याच दिवशी संपला. विशेष म्हणजे 13 सामन्यात इंग्लंडचा चार वेळा पराभव झाला आहे.

अक्षर पटेल भारतीय विजयाचा हिरो

अक्षर पटेल भारताच्या या शानदार विजयाचा हिरो ठरला. दुसरी कसोटी सामना खेळताना पटेलने या कसोटीच्या दोन्ही डावात पाच बळी घेतले. पहिल्या डावात त्याने 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने 32 धावा देऊन पाच बळी घेतले. यासह, तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.

अश्विनचे कसोटीतील 400 विकेट पूर्ण

या कसोटीत सात बळी घेणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी कसोटीत 400 बळी घेतले आहेत. अश्विनने 77 सामन्यांत एका कसोटी सामन्यात 25.01 च्या सरासरीने आणि 2.83 च्या रेटने 400 बळी घेतले आहेत. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनचा समावेश आहे.

India victory at the Narendra Modi Stadium vs england test

दृष्टिक्षेपात सामना

  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या.
  • भारतीय संघ 145 धावा करू शकला. भारताची 33 धावांची आघाडी.
  • इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात 81 धावांवर ऑलआऊट.
  • भारताला 49 धावांचे लक्ष्य मिळाले.
  • भारतीय संघाने विकेट न गमावता 7.4 षटकांत लक्ष्य गाठले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*