फेक न्यूजचा फटका : राजदीप सरदेसाई यांच्यावर इंडिया टूडे चॅनलचीच कारवाई; पंधरा दिवसांसाठी निलंबन आणि पगारावर गदा


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या दरम्यान पोलीसांच्या गोळीबारात शेतकऱ्याचा मृत्यू अशी खोटी बातमी देणारे इंडिया टूडे चॅनलचे संपादक राजदीप सरदेसाई यांच्यावर इंडिया टूडे चॅनलने मोठी कारवाई केली आहे. त्यांना पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असून ऑफ एअर (चॅनलवर दिसण्यास बंदी) करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचा एक महिन्याचा पगारही कापण्यात येणार आहे.  India Today Channel action against Rajdeep Sardesai

नवी दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर ट्रॉली काढण्यात आली होती. भरधाव ट्रॅक्टर चालवत असलेला हा शेतकरी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्ट तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता. पण त्यात ट्रॅक्टर पलटी झाला आणि ट्रॅक्टर खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी ठार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. पण शेतकºयाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणातील सत्य उघड झाले.

शेतकऱ्याचा पोलिसांच्या गोळीने नाही तर ट्रॅक्टर उलटून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, असं समोर आले. मात्र, राजदीप सरदेसाई यांनी या बातमीची कोणतीही शहानिशा न करता इंडिया टूडेवर शेतकऱ्याचा पोलीसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत ट्विटही केले होते, जे नंतर डिलीट केले. नवनित सिंग या शेतकºयाचा पोलीसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यानी मला सांगितले. त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही शेतकरी म्हणाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

या शेतकऱ्याचा तिरंगा ध्वजात गुंडाळलेल्या मृतदेहाचा फोटोही ट्विट केला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप निर्माण झाला. आंदोलन आणखी भडकले. या चुकीसाठी सरदेसाई यांच्यावर इंडिया टूडे व्यवस्थापनाकडूनच कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पंधरा दिवसांसाठी निलंबन आणि महिन्याचा पगार कापला जाणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस राजदीप सरदेसाई चॅनलवर दिसणार नाहीत. कोणत्याही पत्रकारावर अशा पध्दतीची कारवाई ही अत्यंत अपमानास्पद मानली जाते.

राजदीप सरदेसाई यांनी यापूर्वी राष्टÑपती भवनाबाबतही चुकीची माहिती पसरविली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी राष्ट्रपती भवनात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते. त्याचा फोटो राष्टÑपती भवनातर्फे ट्विट करण्यात आले होते. परंतु, राजदीप सरदेसाई यावर ट्विट करताना म्हणाले होते की अनावरण केलेल्या प्रतिमेतील फोटो नेताजींचा नसून त्यांची भूमिका साकारलेल्या प्रसेनजित चॅटर्जी यांचा आहे. त्यांचे हा दावाही नंतर खोटा ठरला होता.

India Today Channel action against Rajdeep Sardesai

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था