भारताची कोरोना लस घेऊन नेपाळ देणार चीनला धक्का, 14 कोटी डोसची गरज

नेपाळ कोरोनाची लस भारताकडून घेणार आहे. त्यामुळे लसीबाबत चीनपेक्षा भारतावर नेपाळचा अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट झाले. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली 14 जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी लसीबाबत करार होण्याची शक्यता आहे. India to give corona vaccine to Nepal Besides China, need 14 crore dose


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : नेपाळ कोरोनाची लस भारताकडून घेणार आहे. त्यामुळे लसीबाबत चीनपेक्षा भारतावर नेपाळचा अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट झाले. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली 14 जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी लसीबाबत करार होण्याची शक्यता आहे.नेपाळ भारत संबंध पूर्वीपासून चांगले आहेत.पण काही दिवसांपूर्वी भारताने नेपाळचा भूभाग बाळकावल्याचा आरोप झाल्यावर संबंध कटू झाले. परंतु आता ते सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे.

India to give corona vaccine to Nepal Besides China, need 14 crore dose

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान ओली यांनी संसद भंग केली. त्यामुळे देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे नेपाळचे परराष्ट्रमंत्री यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
नेपाळला भारताकडून लसीचे 14 कोटी डोस हवे आहेत. दुसरीकडे चीनने लस देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र भारताकडून लस घेऊन नेपाळ चीनला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*