India sends free corona vaccine to Barbados, Country Where Pop Star Rihanna Raised

रिहाना ज्या देशात वाढली त्या देशाला भारताने मोफत पाठवली कोरोनाची लस, बार्बाडोसच्या पीएमनी मानले मोदींचे आभार

प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानाने भारतातील कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या आंदोलनाबद्दल एक ट्विट केले. यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष याकडे गेले आहे. मूळ बार्बाडोसची असलेली गायिका रिहानाचे पूर्ण नाव रॉबिन रिहाना फेंटी असे आहे. रिहाना ज्या देशात वाढली, त्या देशाला भारताने कोरोना लसीचे 1,00,000 डोस पाठवले आहेत. India sends free corona vaccine to Barbados, Country Where Pop Star Rihanna Raised


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानाने भारतातील कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या आंदोलनाबद्दल एक ट्विट केले. यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष याकडे गेले आहे. मूळ बार्बाडोसची असलेली गायिका रिहानाचे पूर्ण नाव रॉबिन रिहाना फेंटी असे आहे. रिहानाने शेतकरी आंदोलनाची एक बातमी शेअर करत ट्वीट केले होते की, “आपण याबद्दल का बोलत नाही?” यानंतर जगभरात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. परंतु रिहाना ज्या देशात वाढली, त्या देशाला भारताने कोरोना लसीचे 1,00,000 डोस पाठवले आहेत.

रिहानाच्या एका ट्विटने जगाचा फोकस भारतावर केंद्रित झाला. दुसरीकडे बार्बेडियन पंतप्रधानांनी भारताचे आभार मानले आहेत. बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमोर मोत्ले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोना विषाणूच्या लसीचे 1,00,000 डोस पाठवल्याबद्दल आभार मानले आहेत.4 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात मोत्ले म्हणाले की, “कोव्हॅक्सिनच्या दानासाठी माझे सरकार आणि जनतेच्या वतीने मी तुमचा, तुमच्या सरकारचा व भारतीय प्रजासत्ताकाचा आभारी आहे.”

बार्बाडोसच्या पंतप्रधानांनी प्रथम पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कॅरेबियन देशांसाठी भारतीय लस देण्याची विनंती केली. आपल्या पत्रात त्यांनी लिहिले की, “आरोग्य आणि कल्याण मंत्री आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी या दोघांनीही याची पुष्टी केली आहे की बार्बाडोसमध्ये लस वापरण्यासाठी मंजूर झाली आहे.”

India sends free corona vaccine to Barbados, Country Where Pop Star Rihanna Raised

कोरोना लसीची मागणी करणार्‍या सुमारे 152 देशांची यादी भारताकडे आहे आणि मार्चपर्यंत किमान 60 देशांना 1.6 कोटी डोस पुरवण्याची अपेक्षा आहे.

India sends free corona vaccine to Barbados, Country Where Pop Star Rihanna Raised

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*