कोरोनाविरोधी लसीकरणात भारत दुसऱ्या क्रमांकावर ; एक कोटी 90 लाख लोकांना डोस


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात एक मार्चपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. देशात आतापर्यंत एक कोटी 90 लाख लोकांना लस दिली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. India ranks second in anti-corona vaccination; Dose to one crore 90 lakh people

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे यांना लस दिली. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यामध्ये 60 वर्षावरील आणि ज्याना गंभीर आजार आहेत. अशा 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. देशात 5 मार्चच्या संध्याकाळपर्यंत एक कोटी 90 लाख लोकांना लस दिली आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलंय.या आधी गुरुवारी देशात सर्वात जास्त लसी देण्यात आल्या. हे प्रमाण बुधवारच्या तुलनेत 40 टक्के होत. लसीकरणात भारत जगात दोन नंबरला आला असून पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. भारतात दुसरा डोसही देण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत अमेरिका, भारत या देशांनंतर ब्रिटन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

India ranks second in anti-corona vaccination; Dose to one crore 90 lakh people

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती