भारताकडे सोपवू नका, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाची अमेरिकेच्या न्यायालयात विनंती; प्रत्यार्पणाचा पेच सुटेना

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने भारताकडे सोपवू नका , अशी विनंती तेथील न्यायालयाला केली. India plea of ​​Tahavur Rana accused in Mumbai terror attack in US court issue resolved

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीचा तो बालमित्र आहे. तो मूळचा पाकिस्तानचा असून कॅनडाचा व्यावसायीक आहे. मुंबईच्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिक आणि 166 जणांचा मृत्यू झाला होता.मुंबई येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हेडली हा माफीचा साक्षीदार बनला असून त्याला 35 वर्षांच्या कारावासाची सजा झाली आहे. पाकिस्तानातील लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेबरोबर संगनमत बांधून हेडली आणि राणा यांनी मुंबईवर हल्ल्याचे कारस्थान रचले.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या मदतीने पार पाडले. त्यातील अजमल कसाबला न्यायालयाने फाशीची शिक्षा यापूर्वीच दिली. परंतु, रिचर्ड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा हे अमेरिकेत अटकेत आहेत. राणावर खटला सुरु आहे.

हेडलीला भारताला सोपविणार नसल्याचे अमेरिकेन स्पष्ट केले आहे. आता तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण होणार की नाही, याचा निर्णय तेथील न्यायालय घेणार आहे. दरम्यान, त्याच्या वकिलांनी प्रत्यार्पण केले जाणार नाही, असा युक्तिवाद विविध कलमांचा आधार घेत केला आहे.

India plea of ​​Tahavur Rana accused in Mumbai terror attack in US court issue resolved

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*