भारत काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही येऊन बस्तान मांडाव, हरियाणाच्या गृहमंत्र्यांचा रोहिग्यांना इशारा

राज्यात आश्रय घेणाऱ्या रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींबद्दल माहिती एकत्र केली जात आहे. भारत काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही येऊन बस्तान मांडावं असा इशारा हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी दिला आहे. India is not a Dharamshala, where anyone can come and pack their bags, Haryana Home Minister warns Rohingyas


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : राज्यात आश्रय घेणाऱ्या रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींबद्दल माहिती एकत्र केली जात आहे. भारत काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही येऊन बस्तान मांडावं असा इशारा हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. हरयाणाच्या मेवातमध्येही रोहिंग्यांची उपस्थिती दिसून येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींविरोधात ‘बनावट’ पासपोर्ट मिळवून फसवणुकीचा प्रकार दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूत राहणाऱ्या रोहिंग्या समुदायातील लोकांची ओळख पटवली जात आहे. याच दरम्यान दोन रोहिंग्या व्यक्तींकडे बनावट पासपोर्ट आढळून आला होता. रहमान आणि गफूर नावाच्या या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात म्यानमारमधील काही सुरक्षा चौक्यांवर सशस्त्र हल्ला झाला व त्यात काही सुरक्षा रक्षक मारले गेले. या हल्ल्यात अरकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा म्यानमार सरकार आणि त्यांच्या लष्कराचा संशय आहे. या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून म्यानमारमधील राखिंगे प्रांतात राहणाºया रोहिंग्या मुस्लिमांना हुसकावून लावण्याचा कार्यक्रमच लष्कराने हाती घेतला. यामुळे सुमारे तीन ते चार लाख रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांचे लोंढे बांगला देशात येऊ लागले असून हजारो भारतातही आले आहेत.

India is not a Dharamshala, where anyone can come and pack their bags, Haryana Home Minister warns Rohingyas

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*