कोरोनाचा नवा घातक विषाणू ओळखून तो आयसोलेट करणारा पहिला देश बनला भारत


भारताने कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची ओळख पटवून तो आयसोलेट करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ओळखून तो यशस्वीरीत्या आयसोलेट करता आलेला नाही. यामुळे हे यश मिळवणारा भारत हा पहिला देश ठरतो.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने कोरोना विषाणू (COVID-19)च्या नव्या स्ट्रेन Sars-CoV-2 ची ओळख पटवून तो आयसोलेट करण्यात यश मिळवले आहे. हा कोरोना विषाणूचा ब्रिटनमधला प्रकार आहे, जो पूर्वीपेक्षा जास्त घातक आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR)ने शनिवारी (2 जानेवारी) याबाबत सांगितले की, या नव्या विषाणूची पहिल्यांदा माहिती मिळाली तेव्हापासूनच आमच्या देशव्यापी प्रयोगशाळांच्या नेटवर्कच्या माध्यमातून या नव्या विषाणूचा शोध घेतला जात होता. India became the first country to isolate a new deadly corona virus

ICMR ने सांगितले की, कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराची त्याच्या सर्व बदलांसहित ओळख पटवण्यात आली आहे. आणि तो यशस्वीरीत्या आयसोलेट करण्यात आला आहे. तो पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (NIV) आयसोलेट करण्यात आला आहे. ब्रिटनहून परतलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे वैद्यकीय नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला, यानंतर हे यश मिळाले. हे भारतीय शास्त्रज्ञांचे सर्वात मोठे यश आहे.India became the first country to isolate a new deadly corona virus

आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ओळखून तो यशस्वीरीत्या आयसोलेट करता आलेला नाही. यामुळे हे यश मिळवणारा भारत हा पहिला देश ठरतो. या विषाणूची ओळख पटवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी ‘Vero Cell Lines’चा वापर केला. विषाणू विज्ञान (Virology) मध्ये व्हेरो सेल लाइन्सना मोठे महत्त्व आहे. विषाणूची ओळख पटवण्यासाठीच याचा वापर होत असतो.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी