जगाला कोरोनाविरोधी लस पुरविण्याची भारतात क्षमता; संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतिरियो गुतरेस यांच्याकडून कौतुक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगाला कोरोनाविरोधी लस पुरविण्याची क्षमता भारतात आहे, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतिरियो गुतरेस यांनी भारताचे कौतुक केले आहे. india ability to supply anti-corona vaccine to the world

ते म्हणाले, भारताने कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम राबविली असून शेजारधर्माचे पालन करून अनेक देशांना लस पुरवली आहे. भारताच्या उदारपणाचे या देशांनी कौतुकही केले आहे.भारत स्वदेशी बनावटीच्या लशीची निर्मिती करत आहे. जगाला लस पुरविण्याची क्षमता भारतात निश्चित आहे, याची मला आता खात्री वाटत आहे. ही लसीकरण मोहीम रावबविण्यात भारत यशस्वी ठरले, असा विश्वास मला वाटतो. आतापर्यंत भारताने 55 डोस शेजरी देशांना गिफ्ट म्हणून दिले आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात लसीकरण मोहीम वेगात

दरम्यान, देशात 20 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिले आहेत. कोव्हिशिल्ड आणि कोव्हेक्सींन लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लास देण्यात येणार आहेत.

india ability to supply anti-corona vaccine to the world

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती