जळगावमध्ये महापौर निवडणुकीत सत्तांतर नाट्य; भाजपमध्ये फूट; ५७ पैकी ३८ नगरसेवक गोटात आणण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न

  • भाजपचे आणखी चार नगरसेवक फुटले

विशेष प्रतिनिधी

जळगाव : जळगावमध्ये महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तांतर नाट्य रंगले आहे. न्यायालयीन तिढा निर्माण होऊ नये यासाठी भाजपचे एक तृतीयांश म्हणजेच ५७ पैकी ३८ नगरसेवक आपल्या गोटात आणण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. Independence drama in Jalgaon mayoral election

सोमवारपर्यंत शिवसेनेकडे भाजपचे २५ नगरसेवक दाखल झाले होते. मंगळवारी प्रा. सचिन पाटील यांच्यासह इतर तीन नगरसेवक देखील शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने ही संख्या २९ पर्यंत पोहोचली असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या महापौरपदाच्या संभाव्य उमेदवार प्रतिभा कापसे यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांना गोटात आणण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपचे नाराज २५ नगरसेवक शिवसेनेने सहलीवर पाठविलेले आहेत. ठरल्यानुसार शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर, तर उपमहापौरपदी नाराज नगरसेवकांची मोट बांधणारे कुलभूषण पाटील यांना संधी देण्याचे ठरले होते. मात्र, या नाट्यात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही प्रवेश झाला. त्यांनी नाराज नगरसेवकांमधील त्यांचे कट्टर समर्थक विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांनाच पुन्हा उपमहापौरपदी संधी देण्याचा आग्रह धरला. दुसरीकडे शिवसेना कुलभूषण पाटील यांच्या नावावर ठाम असल्याने सोमवारी रात्री या फुटीर नगरसेवकांमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचे समजते.पत्नीच्या अपहरणाचा दावा

भाजपच्या माजी स्थायी समिती सदस्य ज्योती चव्हाण सध्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत इगतपुरीत एका हॉटेलवर आहेत. त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी इगतपुरीतील हॉटेलवर दाखल होत, पत्नी ज्योती यांना सोबत पाठविण्याची विनंती केली. मात्र, तेथे उपस्थित विद्यमान महापौर भारती सोनवणे यांचे पती तथा स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी ही विनंती धुडकावली. त्यानंतर चव्हाण हे पत्नीच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल झाले. परंतु, आधी तुम्ही पत्नीचा शोध घ्या, असा सल्ला पोलिसांनी दिल्यानंतर त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

खडकेंना स्थायीचे सभापतीपद

एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी सुनील खडके यांच्या नावासाठी आग्रह केल्याने भाजपमधून बाहेर पडलेले नगरसेवक नाराज झाले. या मुद्द्यावर एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील व एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. शेवटी कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद दिल्यास पुढील स्थायी समिती सभापतीपद सुनील खडके यांना देण्यावर तडजोड झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापौर व उपमहापौरपदासाठी १८ रोजी होणारी निवडणूक ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी महापौर भारती सोनवणे आणि गटनेते भगत बालाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Independence drama in Jalgaon mayoral election

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*