IND vs ENG 2nd ODI Score : 6 गड्यांच्या बदल्यात भारताचा इंग्लंडसमोर 336 धावांचा डोंगर, राहुलचं तुफानी शतक, कोहली-पंतची अर्धशतकं ; हार्दिक पंड्याची झंझावाती साथ

  • प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या बदल्यात भारताने इंग्लंडसमोर 336 धावांचा डोंगर उभा केला आहे. के. एल. राहुलचं शतक, कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

  • भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभूत करुन मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी विजयी सलामी नोंदवली आहे.

विशेष प्रतिनिधी 

पुणे : के एल राहुलच्या तुफानी शतकानंतर रिषभ पंत  आणि हार्दिक पांड्याच्या  वादळाने, टीम इंडियाने दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडसमोर 6 बाद 336 धावांचा डोंगर उभा केला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पुण्यातील गहुंजे मैदानात खेळवण्यात येत आहे. इंग्लडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी चा  निर्णय घेतला . त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली.IND vs ENG 2nd ODI Score: India’s 336 for 6 against England, Rahul’s storming century, Kohli-Pant’s half-century; Stormy accompaniment of Hardik Pandya

भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा (25) आणि शिखर धवन (4) हे स्वस्तात बाद झाले. मात्र कर्णधार विराट कोहली 79 चेंडूत 66 धावा आणि के एल राहुल 114 चेंडूत 108 धावा ठोकून मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली. मग रिषभ पंतने अवघ्या 40 चेंडूत 77 धावा ठोकून वादळ उभं केलं.

त्याला हार्दिक पंड्याने 16 चेंडूत 35 धावा करुन झंझावाती साथ दिली. पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून गहुंजे मैदान दणाणून सोडलं. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल पंड्या 12 धावांवर नाबाद राहिला.

दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे तर इंग्लंडचा नियमित कर्णधार ओयन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्ज दुखापतग्रस्त आहेत.

IND vs ENG 2nd ODI Score: India’s 336 for 6 against England, Rahul’s storming century, Kohli-Pant’s half-century; Stormy accompaniment of Hardik Pandya

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*