राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ; मुंबई-पुण्यामध्ये पुन्हा धोका वाढला


वृत्तसंस्था

मुंबई :  राज्यात मार्चच्या पहिल्याच आठवड्यातच कोरोनानं रौद्ररूप धारण केलं आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या वर्षातील सर्वाधिक 8 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आता मार्चच्या सुरुवातीलाच हा आकडा 9 हजारांच्या पुढे गेला आहे. तसेच मुंबई-पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने या शहरांत कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. Increase in the number of corona patients in the state; The danger increased again in Mumbai-Pune

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बुधवारी 9,855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी तो 8 हजार होता.दुसरीकडे सर्वात जास्त कोरोना रुग्णांची पुणे आणि मुंबईत झाली आहे. पुण्यात बुधवारी  853 तर मुंबईत 1121 नवे रुग्ण आढळले. मुंबईत रुग्णवाढीचा दर गेल्या आठवड्यात 0.28 टक्के होता. आता तो 0.29 टक्के झाला आहे.

राज्यातील 3 मार्चची आकडेवारी

  • एकूण रुग्ण – 21,79,185
  • उपचार घेत असलेले रुग्ण – 82,343
  • बुधवारचे नवे रुग्ण – 9,855
  • बुधवारी बरे झालेले रुग्ण – 6,559
  • एकूण बरे झालेले रुग्ण – 20,43,349
  • रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 93.77 टक्के
  • दिवसभरातील मृत्यू – 42
  • मृत्यूचं प्रमाण – 2.40 टक्के

Increase in the number of corona patients in the state; The danger increased again in Mumbai-Pune

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी