कोरोना काळात ३९ लाख करदात्यांना रिफंड केले तब्बल १.२७ लाख कोटी!


  • इन्कम टॅक्स खात्याच्या प्रभावी कार्यवाहीने सामान्य करदात्यांच्या खातात मोक्याच्या क्षणी पैसा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : या आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने १.२७ लाख कोटीं रूपये हे करदात्यांच्या खात्यावर परताव्याच्या रूपाने जमा केले आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक यंत्रणेचा पुरेपुर वापर करून वैयक्तीक तसेच व्यवसायिक करदात्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.,अशी माहिती अर्थ विभागाचे सचिव अजय भुषण पांडे यांनी दिली. income tax return

कोरोनाच्या कठीण काळात करदात्यांकडून व्यवसाय वाढीविण्याच्या उद्देशाबरोबरच आम्ही परताव्याला तितकेच प्राधान्य दिले. तातडीने खात्यावर पैसे वर्ग करण्याच्या पध्दतीमुळे आमचे काम सुखर होण्यास मदत झाली असल्याचे पांडे यांनी नमूद केले.

श्री. पांडे व प्राप्तीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते २० ऑक्टोबर या कालावधीत ३९.११ लाखापेक्षा अधिक करदात्यांना १.२७ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिकचा परतावा दिलेला आहे. यामध्ये ३३.४४२ कोटींचा वैयक्तीक परतावा हा ३६.२१ लाख करदात्यांना दिलेला आहेincome tax return

अंदाजे १.८९ लाखापेक्षा अधिकच्या करदात्यांना कॉर्पोरेट कर परताव्यांच्या स्वरूपात ९०.०३२ कोटी रूपयांचा प्राप्तीकर दिला असल्याची माहीती सेंट्रेल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी) कडून देण्यात आली. कॉर्पोरेट कर परताव्यात ३८.११ लाखांपेक्षा अधिक करदात्यांना चालु आर्थिक वर्षात पंधरा ऑक्टोबरपर्यत १.२३.४७१ कोटींपेक्षा अधिकचा परतावा दिलेला आहे. ३६.२१.३१७ प्रकरणांमध्ये ३३.४४२ कोटींचा प्राप्तीकर परतावा सादर केला आहे.income tax return

income tax return

सप्टेंबरच्या २९ तारखेपर्यत ३३ लाखांपेक्षा अधिकच्या करदात्यांनी १.१८ लाख कोटींचा परतावा दिलेला होता. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक वर्षे २०१८-१९ साठीचा आयटीआर नोव्हेंबर ३० पर्यत सादर करता येण्याची मुभा देण्यात आली आहे. या अगोदर ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती