बेनामी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बेनामी संपत्ती गोळा केल्या प्रकरणी आयकर विभागाने काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. तपासाशी संबंधित आयटी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. सूत्रांनी बेनामी संपत्ती प्रकरणात आयटी टीमने रॉबर्ट वाड्रांच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला. Income Tax Department is recording the statement of Robert Vadra in connection with Benami Property Caseरॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे घर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप आहे. वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. आयटी विभागाव्यतिरिक्त सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी देखील अफरातफरी प्रकरणात त्यांची कायदेशीर चौकशी करत आहे.

यापूर्वी ईडीने वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. पण वाड्रांच्या वकिलांनी ईडीचे म्हणणे फेटाळून लावत एजन्सी क्लायंटला जेव्हा चौकशीसाठी बोलवेल तेव्हा रॉबर्ट वाड्रा हजर राहतील. आतापर्यंत त्यांनी तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे, असा दावा केला आहे.

Income Tax Department is recording the statement of Robert Vadra in connection with Benami Property Case

ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या क्लायंटने दिली आहेत. ईडीने केलेल्या आरोपाचं खंडन करणे म्हणजे त्यांना तपासात सहकार्य न करणे असा होत नाही, असाही दावा रॉबर्ट वाड्राच्या वकिलांनी केला आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*