In the last financial year Congress And NCP Got Huge Donations Read Story

गत आर्थिक वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीवर पडला पैशांचा पाऊस, कंपन्यांनी दिली कोट्यवधींची देणगी

कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला आर्थिक वर्ष 2019-2020 मध्ये मिळालेल्या देणगीचा तपशील सादर केला आहे. यानुसार 1 अप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान काँग्रेस पक्षाला एकटी आयटीसी आणि तिच्या सहायक कंपन्यांकडून तब्बल 20 कोटी रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे सध्या आयटीसी ही कंपनी काँग्रेसच्या सर्वात मोठ्या देणगीदारांमध्ये सामील झाली आहे. In the last financial year Congress And NCP Got Huge Donations Read Story


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला आर्थिक वर्ष 2019-2020 मध्ये मिळालेल्या देणगीचा तपशील सादर केला आहे. यानुसार 1 अप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान काँग्रेस पक्षाला एकटी आयटीसी आणि तिच्या सहायक कंपन्यांकडून तब्बल 20 कोटी रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे सध्या आयटीसी ही कंपनी काँग्रेसच्या सर्वात मोठ्या देणगीदारांमध्ये सामील झाली आहे. कॉंग्रेसने म्हटले की, आयटीसीने गत आर्थिक वर्षात 13 कोटी दान केले. याव्यतिरिक्त आयटीसी इन्फोटेक आणि रसेल क्रेडिल लिमिटेड या सहायक कंपन्यांनी अनुक्रमे 4 कोटी आणि 1.4 कोटी रुपयांची देणगी दिली.

इलेक्टोरल ट्रस्ट सर्वात मोठा देणगीदार

असे असले तरीही इलेक्ट्रोल ट्रस्ट अद्याप कॉंग्रेसचा सर्वात मोठा देणगीदार आहे. भारती एअरटेल ग्रुप आणि डीएलएफसारख्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट आणि जनकल्याण ट्रस्टकडूनतर्फे गत आर्थिक वर्षात कॉंग्रेसला अनुक्रमे 30 कोटी आणि 25 कोटी रुपयांची देणगी मिळाली. इलेक्टोरल ट्रस्ट 25 कंपन्यांचा समूह आहे, ज्यांना प्रामुख्याने कॉर्पोरेट घराण्यांकडून ऐच्छिक दान मिळते. हे दान नंतर राजकीय पक्षांना देणगी म्हणून दिले जाते. इलेक्टोरल ट्रस्टची खास बाब म्हणजे यात दानशूरांची नावे गुप्त ठेवली जातात. 2019-2020 मध्ये आयटीसी कॉंग्रेस पक्षाची सर्वात मोठी देणगीदार कंपनी म्हणून उदयास आली आहे. तथापि, यापूर्वी 2018-19 मध्ये आयटीसी आणि आयटीसी इन्फोटेकने भाजपला 23 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

कपिल सिब्बल यांचे 3 कोटी, सोनियांचे 50, तर मनमोहनसिंगांचे 54 हजार दान

आयटीसीव्यतिरिक्त कॉंग्रेसला पैसा पुरवणाऱ्या इतर कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये एचईजी लिमिटेड (3.5 कोटी रुपये), मध्य प्रदेशची ग्वाल्हेर एल्कोब्रो (5 कोटी) आणि बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन लिमिटेड (4 कोटी) यांचा समावेश आहे. दुसरीकडे, वैयक्तिक देणगीदारांमध्ये कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी 3 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. नुकतेच त्यांनी कॉंग्रेस पक्षातील सर्व स्तरांवरील बदलांसाठी सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले होते. याशिवाय सोनिया गांधींनी 50 हजार रुपये, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पक्षाला 54 हजार रुपयांची देणगी दिली.कोणत्याही राजकीय पक्षाच्या देणगीच्या अहवालात केवळ 20 हजार रुपयांपेक्षा जास्त योगदानाचा उल्लेख करण्यात येतो. कॉंग्रेसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २० हजार रुपयांहून अधिक देणगी म्हणून 139 कोटी रुपये मिळाले आहेत. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या देणगी अहवालात पक्षांनी देणगीदारांची नावे, पत्ते, पॅन क्रमांक, देणगीची पद्धत आणि देणगीची तारीख नमूद केली आहे. दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत ते सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ही माहिती सार्वजनिक केली जाते.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीवर पडला पैशांचा पाऊस!

सध्या भाजप, सीपीआय, सीपीएम आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अन्य राष्ट्रीय पक्षांच्या देणग्यांचा डेटा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. कॉंग्रेसशिवाय केवळ मायावतींच्या बसपा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ही माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. मागच्या संपूर्ण वर्षात २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळालेली नसल्याचे बहुजन समाज पक्षाने म्हटले आहे, तर राष्ट्रवादीच्या वार्षिक देणग्यांमध्ये पाच पट वाढ झाली असून ती 60 कोटींवर पोहोचली आहे. याचाच अर्थ असा की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा फायदा शरद पवार यांच्या पक्षाला झाला आहे.

In the last financial year Congress And NCP Got Huge Donations Read Story

In the last financial year Congress And NCP Got Huge Donations Read Story

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*