बदायूँ प्रकरणात महिला आयोगाच्या सदस्याचे स्टेटमेंट महिला आयोगालाच भोवले; रेखा शर्मांनी केला खुलासा; महिलांना कोठेही, केव्हाही फिरण्याची मूभा, सुरक्षेची जबाबदारी सर्व समाजाची आणि सरकारची


उत्तर प्रदेशात बदायूँमध्ये महिलेवर क्रूर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाने या गंभीर घटनेची दखल घेत आपल्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पाठवले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक विचित्र विधान केले. ते महिला आयोगाला भोवले. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना त्यावर खुलासा करावा लागला. In the Badaun case, the statement of a member of the Women’s Commission Goes Against Themselve Rekha Sharma Gave Clarification


विशेष प्रतिनिधी

बदायूँ/नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात बदायूँमध्ये महिलेवर क्रूर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाने या गंभीर घटनेची दखल घेत आपल्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पाठवले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक विचित्र विधान केले. ते महिला आयोगाला भोवले. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना त्यावर खुलासा करावा लागला.“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती, तर बलात्कार टळला असता. ती कोणाच्या दबावाखाली असेल, तर तिने वेळ लक्षात घ्यायला हवी होती. उशिरा घराबाहेर जाणे टाळायला पाहिजे होते. पीडित महिला संध्याकाळी एकटी घराबाहेर पडली नसती किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याबरोबर गेली असती, तर आज तिचे प्राण वाचले असते” असे वक्तव्य चंद्रमुखी यांनी केले. त्यावर सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार टीकेचा भडिमार सुरू झाला. महिलेला एकटीला फिरायचे स्वातंत्र्य नाही का, अशी विचारणाही अनेकांनी केली.

रेखा शर्मांना टॅग करून अभिनेत्री पूजा भटने प्रश्न विचारला, की तुम्ही महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांच्या वक्तव्याशी सहमत आहात काय, त्यावर रेखा शर्मा यांनी स्पष्ट खुलासा केला, की महिला त्यांच्या मर्जीने, त्यांना वाटेल तेव्हा, कधीही आणि कुठेही बाहेर फिरू शकतात. त्यांच्यावर अशी बंधने लादली जाऊ शकत नाहीत. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्व समाजाची आणि सरकारची आहे. यात कोणतीही शंका नाही. चंद्रमुखी यांनी वरील वक्तव्य का आणि कसे केले, याची आपल्याला कल्पना नसल्याचेही रेखा शर्मा यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

बदायूँ प्रकरणाची पार्श्वभूमी

उत्तर प्रदेशात बदायूँमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. बदायूँमधील या बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

हादरवून सोडणारी बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या असून, या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला असून, एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले.

In the Badaun case, the statement of a member of the Women’s Commission Goes Against Themselve Rekha Sharma Gave Clarification

३ जानेवारी रोजी महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहिती प्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती