विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उर्जा मंत्री राज कुमार सिंह यांनी शुक्रवारी ग्राम उजाला योजना लाँच केली. या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना 10 रुपयांत एलईडी बल्ब मिळणार आहेत.In rural areas with 3 years warranty LED bulbs for only Rs
ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आलं आहे. या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे. ही सरकारी कंपनी जगातील सर्वात कमी दरातील एलईडी बल्ब विकत आहे.
ही EESL (Energy Efficiency Services Ltd) ची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. EESL भारत सरकारची एनर्जी कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठी एनर्जी सर्विस कंपनी आहे. याची 100 टक्के भागीदारी भारत सरकारकडे आहे.
तीन वर्षांची वॉरंटी
ग्राम उजाला अंतर्गत पहिल्या टप्प्यात 7 आणि 12 वॅटचे एलईडी बल्ब उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बिहारच्या आग्रा, उत्तर प्रदेशातील वाराणसी, आंध्र प्रदेशातील विजयवाडा, महाराष्ट्रातील नागपूर आणि पश्चिम गुजरातमधील काही जिल्ह्यात बल्ब उपलब्ध होणार आहेत. या बल्बची वॉरंटी तीन वर्षांची असेल आणि हे बल्ब केवळ ग्रामीण भारतात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
भारतात 30 कोटीहून अधिक पिवळे बल्ब आहेत. या बल्बला एलईडी बल्बशी रिप्लेस केल्यास, दरवर्षी 40,743 मिलियन किलोवॅट उर्जेची बचत होईल. त्याशिवाय कार्बन डायऑक्साईडमध्येही वर्षाला 37 मिलियन टनची कमी येईल.