नागालँडमध्ये पेट्रोल 19 रुपयांनी तर डिझेल 12 रुपयांनी स्वस्त; करामध्ये कपात करण्याचा निर्णय

वृत्तसंस्था

कोहिमा : पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करण्याची घोषणा नागालँड सरकारने केली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. In Nagaland, petrol is cheaper by Rs 19 and diesel by Rs 12

पेट्रोल आणि तत्सम इंधनावरील करामध्ये 29.80 टक्क्यावरून 25 टक्के प्रति लिटर एवढी कपात केली आहे. म्हणजेच ही कपात 18 रुपये 26 पैसे ते 16 रुपये 4 पैसे एवढी आहे, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.डिझेलचे आता 11 रुपये 8 पैसे आणि 10.51पैसे एवढे स्वस्त झाले आहे.

दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. काही राज्यात इंधन दर सलग दहा दिवस वाढले. पेट्रोलच्या दराने राज्यात 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर आंदोलने केली. परंतु नागालँड सरकारने इंधन करात कपात करून इतर राज्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

In Nagaland, petrol is cheaper by Rs 19 and diesel by Rs 12

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*