In Maharashtra, EVMs are preparing to hold assembly elections through ballot papers

मोठी बातमी! महाराष्ट्रात ईव्हीएमच्या जोडीने मतपत्रिकेतूनही विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी

निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बद्दल कायम प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे पाहता महाराष्ट्रात ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारीही सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात कायदा करण्याचे निर्देश दिले आहेत. In Maharashtra, EVMs are preparing to hold assembly elections through ballot papers


विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बद्दल कायम प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे पाहता महाराष्ट्रात ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारीही सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात कायदा करण्याचे निर्देश दिले आहेत. विधिमंडळात या कायद्यास मान्यता मिळाल्यास स्थानिक संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाईल.मंगळवारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी राज्यातील मतदारांना ईव्हीएमसह मतपत्रिकेचा पर्याय देण्यासाठी विधानभवनात बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 328 अन्वये ईव्हीएमद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला. विधिमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि कायदे व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव यांना मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.

In Maharashtra, EVMs are preparing to hold assembly elections through ballot papers

ते म्हणाले की, यामुळे मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार मतदान करता येईल. तसेच मतदानाची टक्केवारीही वाढेल. खरं तर नागपूरच्या सतीश उकाये यांनी राज्यातील मतपत्राच्या पर्यायाविषयी कायदा करण्यासाठी घटनेच्या कलम 328 अन्वये विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. यावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलावली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*