केवळ चार ते पाच मिनिटामध्ये सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प; डिजिटल फर्स्टवर भर; खासदारांना सॉफ्ट कॉपी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केवळ चार ते पाच मिनिटांत सादर करणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. In just four to five minutes Union budget to be presented; Emphasis on Digital First; Soft copy to MPs

1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णतः डिजिटल स्वरूपात सादर होणार आहे. तसेच तो पॅकेज स्वरूपात मांडला जाणार आहे. खासदारांच्या संगणकावर त्याची कॉपी दिली जाणार आहे. अर्थसंकल्पासाठी कागदाचा प्रचंड वापर यापूर्वी केला जात असे. यंदा मात्र, तो डिजिटल स्वरूपात सादर होणार आहे. त्यामुळे तो सादर करण्यास सीतारामन यांना काहीच मिनिटे पुरणार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.केंद्र सरकारने डिजिटल फर्स्ट ही योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत कागद पत्रावर होणार अफाट खर्च वाचविण्याचा विचार आहे. या पूर्वी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव वर्षाची कॅलेंडर आणि डायऱ्या डिजिटल स्वरूपात दिल्या होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाली होती. कागदाचा होणारा खर्चही वाचला होता.

हलवा बनविण्याची प्रथा कालबाह्य

अर्थसंकल्प सादर होण्या अगोदर अर्थमंत्र्यांच्या हस्ते हलवा बनविण्याची प्रथा असे. या जुन्या कालबाह्य प्रथेला फाटा दिला आहे. तसेच इंग्रजांच्या काळात मार्च अखेर अर्थसंकल्प सादर व्हायचा आणि 26 फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा स्वतंत्र भारतात ही सुरु ठेवली होती. ती मोदी सरकारने मोडून काढली आहे. रेल्वे अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पाचा भाग बनविला आहे. त्यामुळे संसदेचा वेळ आणि अधिवेशन स्वतंत्र बोलविण्यावर होणारा अफाट खर्चही वाचला आहे.

In just four to five minutes Union budget to be presented; Emphasis on Digital First; Soft copy to MPs

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती