देशात पुन्हा लॉकडाऊन नाही, दुसऱ्या लाटेलाही तोंड देण्यास देश तयार, अमित शहा यांचा विश्वास

देशात पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ येणार नाही. समजा चीनी व्हायरसची दुसरी लाट आली तरीही देश त्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार आहे. भारतात कोणतीही परिस्थिती आली तरीही देश त्याला आता तोंड देऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ येणार नाही. समजा चीनी व्हायरसची दुसरी लाट आली तरीही देश त्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार आहे. भारतात कोणतीही परिस्थिती आली तरीही देश त्याला आता तोंड देऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शहा म्हणाले, चीनी व्हायरसची लढाई सगळ्या राज्यांनी चांगल्या पद्धतीने लढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांचं पालनही केलं आहे त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तरीही लॉकडाउनची आवश्यकता भासणार नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठं अभियान चालवतोय. यातून प्रत्येक गाव, शाळा, अंगणवाडी, पोलीस स्थानक, आरोग्य कर्मचारी, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.

चीनी व्हायरसवर लस सापडत नाही तोपर्यंत दोन गज की दुरी हे अंतर राखणं आणि हाथ स्वच्छ ठेवणे, मास्क वापरणे या तीन गोष्टी कराव्या लागतील. जगभरातील सर्वात चांगली आरोग्य सुविधा भारतात मिळतेय. कोणत्या स्टेजवर कोणता रिपोर्ट काढायचा आणि कोणते औषध द्यायचे ? याचा रिपोर्ट बनविला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जेव्हा देशात लॉकडाऊन लागला तेव्हा विरोधी पक्षनेते विशेषत: राहुल गांधी यांनी लॉकडाऊन लावण्याची गरज नव्हती असे म्हटले होते. पण लॉकडाऊन लावला नसता तर कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रातील लाखो जण दगावले असते असा दावाही शहा यांनी केला. खूप काळ मला लिखाण आणि वाचन करण्यास वेळ मिळाला नव्हता. पण दीड महिना मला तो वेळ मिळाला. मागे जाऊन पाहण्याचा, विचार करण्याचा विचार, आपलं कुठे काय चुकलं ? ती चूक पुढे होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचा वेळ मिळाल्याचे अमित शाह म्हणाले.

चीनी व्हायरसची लढाई लढताना भारतापेक्षा पाकिस्तानने चांगली कामगिरी केली आहे, असं शशी थरुर यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता अमित शाह म्हणाले, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत मला आश्चर्य वाटलं नाही कारण काँग्रेस सुरुवातीपासूनचं धोरण हे असंच आहे.

काँग्रेस नेते कायमच पाकिस्तानची पाठ थोपण्याचं काम केलं आहे. राहुल गांधी यांनीही पाकिस्तानला पाठिंबा देणारी वक्तव्य याआधी केली आहेत. तसेच मणिशंकर अय्यर यांनीही केली आहेत. आता शशी थरुर बोलत आहेत. काँग्रेस अत्यंत गलिच्छ राजकारण करताना देशाचे हित, देशाचा सन्मान हा आपण पणाला लावतो आहोत याचा विचारही करत नाही.

देशाच्या जनतेला काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता ठाऊक आहे. त्यामुळे त्यांची ही नीती उघड झाली आहे. चीनी व्हायरसचे संकट हे कोणत्याही राजकारणापेक्षा वेगळं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणालाही न सांगता राज्यांमध्ये आरोग्य पथकंही पाठवली. आम्हाला कुणालाही कमी लेखायचं नव्हतं. आम्हाला सगळ्या राज्यांनी चांगलं सहकार्य केलं. अपवाद होता तो फक्त बंगालचा असेही शहा यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*