आसामसाठी भाजपचा जाहीरनामा; महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार!

वृत्तसंस्था

गुवाहाटी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सीमानिश्चितीच्या माध्यमातून जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्याच्या आश्वासनांसह जाहीरनाम्यात दहा प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत.

आसामध्ये भाजप सत्तेवर आल्यास प्रत्येक मुलाला विनामूल्य शिक्षण, पूरनियंत्रणासाठी उपाय करणे, आवश्यक वस्तूंबाबत राज्याला स्वावंलबी बनविणे आदी आश्वासनेही या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. ‘ओरुंडोई’ योजनेतंर्गत महिलांना सध्या ८३० रुपये देण्यात येतात. ही रक्कम तीन हजार रुपये करण्याचे तसेच पात्र रहिवाशांना जमीन अधिकार बहाल करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) मोहिम राबविण्यात येत आहे. मूळ भारतीय नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करून सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची हाकालपट्टी करण्याचा या मोहिमेचा हेतू आहे. त्यासाठी, आसाममध्ये नागरिकांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात दिले आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने

  • सीमानिश्चितीच्या माध्यमातून जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण
  • नागरिकांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती
  • प्रत्येक मुलाला विनामूल्य शिक्षण देणे.
  • पूरनियंत्रणासाठी उपाय करणे.
  • राज्याला स्वावंलबी बनविणे.

In Assam BJP promised women to give three thousands rupees every months

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*