impose presidential rule in Maharashtra, MP Girish Bapat's demand in the Lok Sabha

Presidential Rule In Maharashtra? : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, खा. गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे अवघ्या देशभरात खळबळ उडालेली असताना हा मुद्दा आता देशाच्या संसदेत (Presidential Rule In Maharashtra) पोहोचला आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये हप्ता वसुलीचे टारगेट दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळल्याचे म्हणत विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे अवघ्या देशभरात खळबळ उडालेली असताना हा मुद्दा आता देशाच्या संसदेत  (Presidential Rule In Maharashtra) पोहोचला आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये हप्ता वसुलीचे टारगेट दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळल्याचे म्हणत विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवर आक्रमक पवित्रा घेतल्याचे आज पाहायला मिळाले. ते म्हणाले की, इतके दिवस गुंड खंडणी वसूल करतात हे पाहिले होते, पण आता सरकारसुद्धा खंडणी वसुली करतेय हे पहिल्यांदाच दिसून आले आहे. अशा भ्रष्ट लोकांना सत्तेत राहण्याचा बिलकुल अधिकार नाही, यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

महाआघाडी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात अतिशय सविस्तरपणे पुराव्यानिशी नोंदी लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीची माहिती जगासमोर आणली. यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने यासाठी रविवारी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन पुकारले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर एवढेच नाही तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही हे अतिशय गंभीर प्रकरण असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, व त्यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गिरीश बापट यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अशा शक्यता लक्षात घेऊन सकाळीच प्रतिक्रिया दिली होती. राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचा विचार केला तर त्या आगीची झळ तुम्हाला बसेल.

अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. परमबीर सिंहांचे पत्र हा काही पुरावा नाही, यामुळे देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका आता आघाडी सरकारने घेतली आहे. दुसरीकडे, असेच जर सगळ्यांचे राजीनामे घेत राहिलो, तर सरकार चालवणे अवघड होईल, असे संजय राऊत म्हणाले. परंतु, जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*