डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची सुनावणी उद्यापासून, ट्रम्प यांना आरोप अमान्य

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची सुनावणी उद्यापासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेटमध्ये त्यांच्या वकीलांनी ट्रम्प यांच्यावरील आरोप नाकारले.impeachment hearing against Donald Trump will be held tomorrow 

ट्रम्प यांच्या भाषणामुळे लोकांना चिथावणी मिळून त्यांनी ६ जानेवारीला कॅपिटॉल इमारतीत हिंसाचार केल्याचा आरोप आहे. मात्र, भाषणाचा आणि हिंसाचाराचा काहीही संबंध नव्हता, असा दावा ट्रम्प यांच्या वकीलांनी केला आहे.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. आता मात्र ते ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता कमी आहे.

ट्रम्प हे आता अध्यक्ष नसल्याने त्यांच्याविरोधात महाभियोग चालविणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, असे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आज ट्रम्प यांच्या वकीलांनीही आरोप अमान्य केले. सिनेटमध्ये दोन्ही पक्षांकडे समसमान मते आहेत.

त्यामुळे महाभियोग मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव लोकप्रतिनिधीगृहात बहुमताने मंजूर झाला आहे. आता सिनेटमध्ये त्याची सुनावणी सुरु होणार आहे. याठिकाणी ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्य क आहे.

impeachment hearing against Donald Trump will be held tomorrow

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*