IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केले नव्या कृषी कायद्यांचे समर्थन, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याचाही विश्वास


केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांचे समर्थन करत आएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ म्हणाल्या या कायद्यांची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आपल्या उत्पादनाची विक्री कोणत्याही कराविना बाजार समित्यांच्या क्षेत्राच्या बाहेर करु शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. IMF chief economist Geeta Gopinath supported the new agricultural laws


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केले आहे. त्यांच्या मते या नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. गीता गोपीनाथ यांनी भारतातील कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलंय.

गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. त्या आधी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात अध्ययनाचं काम केलं आहे. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या गीता गोपीनाथ या सध्या अमेरिकन नागरिक आहेत. गीता गोपीनाथ यांनी आपली पदवी दिल्ली विद्यापीठातून प्राप्त केली आहे.

गीता गोपीनाथ म्हणाल्या की, “भारत सरकारचे हे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील. या कायद्यांची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आपल्या उत्पादनाची विक्री कोणत्याही कराविना बाजार समित्यांच्या क्षेत्राच्या बाहेर करु शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल.



कोणत्याही मोठ्या सुधारणा लागू केल्यानंतर ठराविक काळापर्यंत त्याची काही किंमत चुकवावी लागते. त्यावेळी दुर्बल शेतकऱ्यांना त्याचा तोटा होण्याची शक्यता असते. म्हणून अशा शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असते.

IMF chief economist Geeta Gopinath supported the new agricultural laws

केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये तीन नवीन कृषी कायद्यांना संसदेत मान्यता दिली होती. याविरोधात पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे आंदोलन सुरु असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत मोठा हिंसाचार झाला आणि यात 300 हून जास्त पोलीस जखमी झाले .

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती