‘मास्क लावला नाही तर..’ – हे इशारे भेंडी बाजार आणि बेहरामपाड्यातही द्या, संदीप देशपांडे यांचा अस्लम शेख यांच्यावर निशाणा

मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी, मास्क लावला नाही तर लॉकडाउन करावा लागेल, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वत:च्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. ‘If you don’t wear a mask Dare to give such warnings in Bhendi Bazaar and Behrampada too Sandeep Deshpande targets Aslam Sheikh


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी, मास्क लावला नाही तर लॉकडाऊन करावा लागेल, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वत:च्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.रुग्णसंख्या वाढत आहे, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे. लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली जाते. पण, प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवतात. अशा लोकांवर कारवाई सुरू केली आहे, असे सांगत-सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी परिस्थिती बिघडल्यास लॉकडाउन लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

यावर देशपांडे यांनी अस्लम शेख यांना प्रश्न केला आहे. मुंबईतील विशिष्ट धर्मियांची वस्ती असलेल्या अनेक भागांत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. याबाबत माध्यमांमधून सातत्याने चर्चा होत आहे. स्वत: अस्लम शेख ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत तेथेही हीच परिस्थिती आहे.

‘If you don’t wear a mask Dare to give such warnings in Bhendi Bazaar and Behrampada too Sandeep Deshpande targets Aslam Sheikh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*