संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल तर सांगा, चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सवाल

औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं तुम्ही ठरवत असाल, तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे, संभाजी महाराजांवर नाही. संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा. औरंगजेबाचंच नावं औरंगाबादला ठेवा हा आग्रह कशासाठी? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. If you are allergic to Sambhaji Maharaj, tell me, Chandrakant Patil’s question to Congress-NCP


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं तुम्ही ठरवत असाल, तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे, संभाजी महाराजांवर नाही. संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा. औरंगजेबाचंच नावं औरंगाबादला ठेवा हा आग्रह कशासाठी? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांना सवाल केला होता. मिटकरींच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे.पाटील म्हणाले की, देशामध्ये परकीय आक्रमणाच्या खाणाखुणा असलेली नावं आहेत ती बदला. अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबादचं पण बदला, माझी काहीच अडचण नाही, पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं तुम्ही ठरवत असाल, तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे. संभाजी महाराजांवर नाही. संभाजीमहाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा.

If you are allergic to Sambhaji Maharaj, tell me, Chandrakant Patil’s question to Congress-NCP

पाटील म्हणाले, अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीये. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना, यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*