मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही तर मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे फाडू, छावा संघटनेचे इशारा


मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लागल्यास मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे फाडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधूनच आरक्षण द्यावं, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे.


विशेष प्रतिनिधी

लातूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लागल्यास मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे फाडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधूनच आरक्षण द्यावं, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे. If the issue of Maratha reservation is not resolved, then enter the ministry and tear the clothes of the ministers, a warning from the Chhawa organization
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची राज्यव्यापी बैठक रविवारी लातूरमध्ये झाली. या बैठकीत ही मागणी करण्यात आली. जावळे म्हणाले की, अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक लातूरमध्ये बोलावण्यात आली होती.या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी दिशा ठरवण्यात आली. ही आजची भूमिका नाही, तर अण्णासाहेब जावळे यांनी 25 वषार्पूर्वीच ही भूमिका मांडली होती. यानुसार ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे. यापुढे देखील टीकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर छावा संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लढा उभारण्याचा निश्चय बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होती, मात्र ती तारीखही लांबली आहे. 8 ते 18 मार्च या काळात सुनावणी होणार आहे. 18 मार्चला सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावर आपला निर्णय देईल. तोपर्यंत आमचं शांततेत आंदोलन असेल. परंतु त्यात हा प्रश्न सुटला नाही तर त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे मंत्री असो, आमदार असो किंवा केंद्राचे मंत्री किंवा खासदार असो सर्वांना इशारा आहे की त्यांनी जर मराठा आरक्षणाची व्यवस्थित बाजू मांडली नाही, तर या लोकांना त्या त्या जिल्ह्यात नागवं करुन मराठा समाज चाबकाचे फटके ओढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जावळे यांनी दिला आहे.
जावळे म्हणाले की, यापुढील काळात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गनिमी काव्याने आंदोलनं होतील. या प्रश्नावर महाराष्ट्रात जो उद्रेक घडेल त्याला हे सरकार जबाबदार असेल. मराठा आरक्षणाला सरकार आतून विरोध करत असेल तर आम्ही मंत्रालयात घुसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही.

If the issue of Maratha reservation is not resolved, then enter the ministry and tear the clothes of the ministers, a warning from the Chhawa organization

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती