…हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं : पंकजा मुंडे


सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. मात्र दोन-तीन दिवसांनंतर रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण आता शांत झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वांचे लक्ष पंकजा मुंडे ह्या काय प्रतिक्रिया देतात याकडे लागेल होते. मात्र , हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं अशी संवेदनशील प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. If it was anyone’s subject, I would not have made its political capital: Pankaja Munde

तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये असे त्या म्हणाल्या. तरीही सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन करत भविष्यात यासंबंधी निकाल लागणार आहेच अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

If it was anyone’s subject, I would not have made its political capital: Pankaja Munde

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था