उत्तर प्रदेशात आज निवडणुका झाल्यास पुन्हा योगी सरकार, रोजगाराच्या पातळीवर नेत्रदीपक काम

कोरोना साथ आणि लॉकडाऊनच्या काळात कामाचा डोंगर उभा करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. रोजगारासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीला लोकांनी सर्वाधिक पसंद केले आहे. त्यामुळे आज निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात गेल्या वेळीपेक्षाही मोठ्या बहुमताने निवडून येण्याचा अंदाज एबीपी- सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.If elections are held in Uttar Pradesh today, Yogi government again, spectacular work at the level of employment


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना साथ आणि लॉकडाऊनच्या काळात कामाचा डोंगर उभा करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. रोजगारासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीला लोकांनी सर्वाधिक पसंद केले आहे.

त्यामुळे आज निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात गेल्या वेळीपेक्षाही मोठ्या बहुमताने निवडून येण्याचा अंदाज एबीपी- सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये चार वर्षांपूर्वी प्रचंड बहुमत मिळवत भाजपाने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते.एबीपी न्यूज-सी व्होटरने केलेल्या सर्वेमधून समोर आलेल्या कलानुसार आज विधानसभेची निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेवर येईल.

उत्तर प्रदेशच्या जनतेने योगी सरकारची सर्वोत्तम कामगिरी म्हणून रोजगार उपलब्धतेचा उल्लेख केला आहे. २८ टक्के लोकांनी नव्या नोकºया, १२ टक्के लोकांना कोरोनावरील नियंत्रण, १६ टक्के लोकांनी गुन्हेगारांवरील नियंत्रण आणि १६ टक्के लोकांनी राम मंदिर हे योगी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

रोजगार उपलब्धतेमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण अशी विचारणा केली असता ५३ टक्के लोकांनी योगींच्या नावाचा उल्लेख केला. तर २१ टक्के लोकांनी अखिलेश यादव आणि १६ टक्के लोकांनी मायावतींचे नाव घेतले.

योगी सरकारच्या काळात अपराध नियंत्रणात आले का असा प्रश्न विचारला असता ५३ टक्के लोकांनी होकारार्थी तर ३५ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिले. तर १२ टक्के लोकांनी काही सांगू शकत नाही, असे उत्तर दिले.

या ओपिनियन पोलनुसार आज निवडणुका झाल्यास भाजपाला ४१ टक्के, समाजवादी पक्षाला २४ टक्के, बसपाला २१ टक्के मते मिळतील. काँग्रेसला केवळ ६ टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते.

मतांच्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला २८४ ते २९४, समाजवादील पक्षाला ५४ ते ६४, बसपाला ३३ ते ४३ आणि काँग्रेसला १ ते ७ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यात १० ते १६ जागा जातील. या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांमधील १५ हजार ७४७ लोकांचे मत जाणून घेण्यात आले.

If elections are held in Uttar Pradesh today, Yogi government again, spectacular work at the level of employment

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*