लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी बनली आयएएस, पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस बनली आहे. IAS became the daughter of Lok Sabha Speaker Om Birla


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस बनली आहे. अंजलीने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे.

अंजली ही ओम बिर्ला यांची धाकटी मुलगी आहे. दुसऱ्या यादीमध्ये अंजलीचे नाव आल्यावर बिर्ला परिवाराच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अंजलीने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही सायन्स घेण्याऐवजी आर्टसला प्रवेश घेतला. कोटा येथील सोफिया स्कूलमध्ये बारावी केल्यावर त्यांनी दिल्लीतील रामजस कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनापासूनच अंजली आयएएसची तयारी करत होती. पदवी घेतल्यावर एक वर्ष दिल्लीमध्ये राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला.अंजलीने सांगितले की दररोज दहा ते बारा तास अभ्यास करत होती. घरामध्ये राजकीय वातावरण असले तरी प्रशासकीय सेवेत जाण्याच्या निर्णयाबाबत अंजली म्हणाली, आमच्या कुटुंबातील प्रत्येक जण कोणत्या कोणत्या स्वरुपात सामाजिक सेवा करत आहे. वडील राजकारणी आहेत तर आई डॉक्टर आहे. त्यामुळेच स्वत:च्या पायावर उभी राहून मी एका नव्या क्षेत्रातून समाजाची सेवा करू इच्छित होते. त्यामुळे आयएएससाठी अभ्यास करायला सुरूवात केली. आयएएस च्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या चळवळीला बळकटी देण्याचा अंजलीचा मानस आहे.

IAS became the daughter of Lok Sabha Speaker Om Birla

अंजलीने आपल्या यशाचे श्रेय मोठी बहिण आकांक्षाला दिले आहे. आकांक्षा सीए आहे. अंजलीने सांगितले की आकांक्षाने मला शिकविले. प्रत्येक वेळी मला प्रेरणा दिली. अगदी परीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंत तयारी करून घेतली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*