मी घरीच राहतो; काही महिन्यांनतर तुम्ही सगळे मरा, नितेश राणे यांची टीका

या आधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. आता म्हणताहेत की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता अजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी, असं म्हणतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. आता म्हणताहेत की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता अजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी, असं म्हणतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

चीनी व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत कोरोना संकटापासून स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला तसेच शेजाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. या मोहिमेवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकावर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज्यात चीनी व्हायरसची साथ सुरू झाल्यापासून मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत. त्यांनी राज्यात दौरे केले नाहीत. एक-दोन प्रसंग वगळता जनतेमध्ये गेले नाहीत. अधिकाऱ्यांच्या बैठकाही ते आपल्या घरीच किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतात.

त्यामुळे राज्यातील प्रशासकीय व्यवस्था शिथिल पडली असल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी माझे कुटुंब- माझी जबाबदारीही मोहीम सुरू केली आहे. सुरूवातीला तुम्ही जबाबदारी घेणार असे म्हणत होता. मग आता जबाबदारी नागरिकांवर का टाकता? असा सवाल राणे यांनी केला आहे. यावर ठाकरे यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी एकाच वेळेला पोहचू शकतो तर ते का वापरु नये?, असा प्रश्न केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*