हुरुन इंडियाचा वेल्थ रिपोर्ट 2020: मुंबई हे देशातील सर्वात श्रीमंत शहर ; तब्बल 16,933 कोट्यधीश मुंबईत

विशेष प्रतिनिधी

मुंबई: देशात कोट्यधीश आणि मध्यमवर्गीय कुटुंबांत वाढ झाली असल्याचं हुरुन इंडियाच्या अहवालातून समोर आलं आहे. हुरुन इंडियाने मंगळवारी वेल्थ रिपोर्ट 2020 जाहीर केला. या अहवालानुसार, मुंबई हे देशातील सर्वात श्रीमंत शहर आहे. मुंबईत 16933 कोट्यधीश आहेत. Hurun India’s Wealth Report 2020: Mumbai is the richest city in the country; As many as 16,933 billionaires in Mumbai

देशात 4.12 लाख नवीन कोट्यधीश आणि 6.33 लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अहवालात म्हटलं आहे की, नव्या कोट्यधीशांमध्ये 3000 कुटुंबांची नेटवर्थ 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती आणि ते ‘सुपर रिच’च्या श्रेणीत समाविष्ट झाले आहेत. तर नवीन मध्यमवर्गीय कुटुंबांची 20 लाख रुपयांची वार्षिक सरासरी बचत आहे. सामान्य मध्यमवर्गीयांची संख्या 5.64 कोटी आहे. त्यांची वार्षिक कमाई अडीच लाख रुपये असून एकूण संपत्ती 7 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.मुंबईत 16933 कोट्यधीश कुटुंबे असून त्यांचा देशाच्या जीडीपीत 6.16 टक्के वाटा आहे. तर नवी दिल्लीत 16 हजार कोट्यधीश आणि आणि कोलकातामध्ये 10 हजार कोट्यधीश आहेत. राज्यांमध्ये 56 हजार श्रीमंतांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे.

हुरुन इंडियाने सर्व्हे केलेल्या श्रीमंतांनी सांगितलं की, त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन ठरले. परदेश प्रवासासाठी स्वित्झर्लंड, अमेरिकेनंतर ब्रिटनला ते पसंती देतात. तर गुंतवणुकीसाठी सिंगापूर आणि यूएईनंतर अमेरिकेला सर्वांची पसंती आहे. विदेशात शिक्षणाबाबतही अमेरिकेला सर्वाधिक पसंती आहे.

Hurun India’s Wealth Report 2020: Mumbai is the richest city in the country; As many as 16,933 billionaires in Mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*