मानवता परमो धर्म:!! कर्मचार्यांसाठी मालक म्हणजे खरोखरच ‘रतन’

टाटा समुहात काम करणारा माजी कर्मचारी गेले दोन वर्ष आजारी असल्याने टाटांनी त्यांची भेट घेत तब्येतिची विचारपूस केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच चांगल्या उपायोजना करत असतात. आता परत एकदा मानवता परमो धर्म: हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात केंद्राला १५०० कोटींची मदत करणाऱ्या टाटांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देखील कमी नव्हते केले आणि दिवाळीचा बोनसही दिला होता. त्यामुळे टाटांविषयी सर्वांनाच आदर आहे.आज अचानक मागील दोन वर्षांपासुन आजारी असलेल्या आपल्या माजी कर्मचार्याला भेटण्यासाठी टाटा पुण्यात पोहचले. Humanity is the ultimate religion For employees, the boss is really the Ratan tata

टाटा समुहात काम करणारा माजी कर्मचारी गेले दोन वर्ष आजारी असल्याने टाटांनी त्यांची भेट घेत तब्येतिची विचारपूस केली आहे. याबरोबरच त्या कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील ते स्वत: करतील असे वचन त्यांनी दिले आहे. टाटा नेहमीच आपल्या वागण्यातून समाजाला मानवता आणि प्रेमाचा संदेश देत आले आहेत. संबंधित आजारी कर्मचारी आणि टाटांच्या भेटीचा फोटो तेथील सोसायटीतील एकाने ट्विटरला पोस्ट केला आहे.टाटांचे कर्मचारी प्रेम –
टाटा सुमो ही लोकप्रिय कार या कारचे नाव सुमो असल्याची कथाही खूप रंजक आहे. टाटा यांनी हे नाव त्यांचे माजी एमडी सुमंत मुळगावकर यांच्या नावावर ठेवले. त्याच्या नावाची पहिली आणि दुसरी अक्षरे वापरुन वाहन सुमो असे नाव पडले. टाटा कंपनीसाठी हे नाव खूपच भाग्यवान होते आणि टाटा सुमोची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. रतन टाटा यांच्या कर्मचार्‍यांशी असलेल्या नात्याचे हे अनन्य उदाहरण होते.

Humanity is the ultimate religion For employees, the boss is really the Ratan tata

दरम्यान, रतन टाटांचा हा फोटो सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ८३ वर्षाच्या टाटांनी घेतलेल्या या भेटीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*