महिला अत्याचारांविरोधात ऑस्ट्रेलियात जनता रस्त्यांवर, तब्बल चाळीस शहरांमध्ये पडसाद

वृत्तसंस्था

सिडनी – मागील काही दिवसांत अनेक बड्या नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप होऊ लागल्याने सामान्य जनतेमध्ये रोषाचे वातावरण आहे. या जनक्षोभामुळे सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियात महिलांवरील वाढते अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांच्या निषेधार्थ आज मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक रस्त्यांवर उतरले. Huge demonstrations in Austalia

ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा, सिडनी आणि मेलबोर्न आदींसह चाळीस शहरांमध्ये या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. महिलांच्या समस्यांबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मात्र आंदोलकांची भेट घ्यायला नकार दिला.याबाबत त्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला रविवारी चर्चेसाठी संसदेमध्ये बोलाविले होते पण आंदोलकांच्या नेत्यांनी बंद दाराआड सरकारशी चर्चा करायला नकार दिला आहे.माजी राजकीय सल्लागार ब्रिटनी हिग्गीन्स यांनी फेब्रुवारीत २०१९ साली मंत्र्याच्या कार्यालयामध्येच त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. हिग्गीन्स यांनी सोमवारी संसदेच्या बाहेर आंदोलकांसमोर भाषण केले. त्यात त्यांनी ऑस्ट्रेलियात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांची लोकांमधील वाढती स्वीकारार्हता भयानक असल्याचे म्हटले होते. या अत्याचाराच्या घटना देशाच्या संसदेमध्ये घडत असतील तर त्या अन्यत्र कोठेही घडू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Huge demonstrations in Austalia

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*