How to find covid 19 Vaccine Center, simple trick to find on this made in india map

How to find covid 19 Vaccine Centre : तुमच्या घराजवळ कुठे मिळते कोरोनाची लस, मेड इन इंडिया नकाशावर शोधण्याची ही आहे सोप्पी ट्रिक

देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. सरकारीबरोबरच आता खासगी रुग्णालयांनाही कोरोनाची लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कोरोना लसीसाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू आहे. नोंदणीनंतर, लसीकरण केंद्राची माहिती आणि वेळ आपल्या मोबाइलवर येईल, परंतु जवळपास कोरोना लसीकरण केंद्र कोठे आहे हे आपणास जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. How to find covid 19 Vaccine Center, simple trick to find on mapmyindia


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. सरकारीबरोबरच आता खासगी रुग्णालयांनाही कोरोनाची लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कोरोना लसीसाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू आहे. नोंदणीनंतर, लसीकरण केंद्राची माहिती आणि वेळ आपल्या मोबाइलवर येईल, परंतु जवळपास कोरोना लसीकरण केंद्र कोठे आहे हे आपणास जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

मॅप माय इंडियाने त्यांच्या नकाशासाठी एक नवीन अपडेट आणली आहे. यामुळे तुम्हाला मॅप माय इंडियावरच लगेच कळेल की कोरोनाची लस तुमच्या घराजवळ कोठे मिळते! डेटासाठी मॅप माय इंडियाने कोविन पोर्टलबरोबर भागीदारी केली आहे. मॅप माय इंडिया हे एक मेड इन इंडिया मॅपिंग अॅप आणि पोर्टल आहे जे गुगल मॅप आणि अॅपल मॅपशी स्पर्धा करते.मॅप माय इंडियावर कसे शोधाल लसीकरण केंद्र?

मॅप माय इंडियावर कोरोना लसीकरण केंद्रे शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर MapmyIndia हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. किंवा थेट MapmyIndia वेबसाइटवरही जाऊ शकता. यानंतर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर सर्च बॉक्समध्ये करंट लोकेशन टॅबवर क्लिक करा किंवा स्वत:चा अॅड्रेस टाका. आता डाव्या बाजूला दर्शविलेल्या लसीकरण केंद्राच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्राची माहिती कोरोना व्हॅक्सिनच्या लोगोसह मिळेल.

महत्त्वाचे म्हणजे देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी दिली जातेय. यासह गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या 45 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाही लस दिली जात आहे. लसीकरणावेळी नोंदणीची माहिती आणि स्वत:चे ओळखपत्र आपल्यासोबत ठेवणे गरजेचे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*